महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेड व व्हेंटीलेटर अभावी पाटण तालुक्यातील रुग्णांचा जातोय हकनाक बळी..!

पाटणमधील कोरोनाबाधित रुग्णांना त्रास जाणवू लागल्यास त्यांना कराड अथवा सातारा येथे जावे लागत असल्याने तेथे रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच अन्य आजारांच्या बाबतीतही रुग्णांची हीच अवस्था असल्याने नातेवाईक चांगलेच धास्तावले आहेत.

corona positive patient died due to lack of bed and ventileters at patan taluka in satara
corona positive patient died due to lack of bed and ventileters at patan taluka in satara

By

Published : Aug 15, 2020, 6:53 AM IST

पाटण (सातारा) - पाटण तालुक्याने मंगळवारी कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा 400 चा आकडा पार केला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोना केअर सेंटर, विलगीकरण कक्ष आणि प्रशासनावर मोठा ताण आला आहे. त्यातच हॉस्पीटलमध्ये बेड आणि व्हेंटिलेटर न मिळाल्याने वेळेत उपचार मिळू शकत नाहीत. परिणामी पाटण तालुक्यातील अनेक जणांचा हकनाक बळी गेला आहे व आजही जात आहे.

खुद्द पाटण शहरातही पाच जणांना कराड येथे हॉस्पीटलमध्ये बेड आणि व्हेंटीलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यासह पाटण शहरात संतापाचे वातावरण आहे. पाटणमधील कोरोनाबाधित रुग्णांना त्रास जाणवू लागल्यास त्यांना कराड अथवा सातारा येथे जावे लागत असल्याने तेथे रुग्णांच्या नातेवाईकांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच अन्य आजारांच्या बाबतीतही रूग्णांची हीच अवस्था असल्याने नातेवाईक चांगलेच धास्तावले आहेत.

पाटण तालुक्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. आजअखेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 412 इतकी झाली आहे. त्यापैकी तब्बल 248 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत तालुक्यातील 22 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. अद्यापही जवळपास 150 च्यावर कोरोनाबाधित रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मृत्यूमध्ये जवळपास 50 ते 55 वर्षे वयोगटाच्यावरील वयोवृध्द लोकांचा समावेश आहे. यात अनेक रुग्णांना केवळ हॉस्पीटलमध्ये बेड आणि व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

हॉस्पीटलमध्ये बेड आणि व्हेंटिलेटर न मिळाल्याने यातील पाच जणांचा अंत झाला आहे. एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यावर आणि त्याला त्रास होवू लागल्यास तात्काळ कराड अथवा साताराला हलवावे लागत आहे. पाटण शहरात मोठमोठी दवाखाने असताना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे. शहरात गत आठवड्यात मृत पावलेल्या रूग्णांना धाप लागली होती. नातेवाईकांनी त्यांना कराड येथे नेवून कोविड हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता मात्र हॉस्पीटलमध्ये बेड नाही तर व्हेंटिलेटर देखील मिळाले नाही. जवळपास सात ते आठ तास रुग्ण ही गाडीतच मृत्यूशी झुंज देत बेड आणि व्हेंंटीलेटरच्या प्रतिक्षेत होते. यातील काही जणांचा गाडीतच मृत्यू झाला. तर काहींचा सातारा येथे शासकीय रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकही धास्तावले आहेत. या दुर्देवी घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details