कराड (सातारा) - येथील कृष्णा हॉस्पिटलधील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यासंबंधित अहवाल आज (शुक्रवारी) आला. त्यामुळे कराड तालुक्यातील रूग्णांची संख्या आता 12वर पोहोचली आहे.
कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा - krishna hospital karad satara
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलधील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यासंबंधित अहवाल आज (शुक्रवारी) आला. कराड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 12 वर पोहचल्यामुळे सातारा जिल्ह्यात कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
मलकापूरमध्ये मागील पाच दिवसात 4 कोरोनाबाधित आढळले आहेत. कराड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 12वर पोहचल्यामुळे सातारा जिल्ह्यात कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कराड, मलकापूर या दोन शहरांसह तालुक्याचा ४० टक्के भाग पूर्णपणे लॉकडाऊन केला आहे. त्यानंतरही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कराडमध्ये तळ ठोकला आहे.
हेही वाचा -चोरट्यानं फोडलं कोरोनाबाधित महिलेचं घर!