सातारा- विदेशातून आलेल्या एका ६३ वर्षीय व्यक्तीला शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल हृदयविकाराच्या झटक्याने या रुग्णाचा मृत्यू झाला होता. हा रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कॅलिफोर्नियातून साताऱ्यात आलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे, पहिला अहवाल होता निगेटिव्ह - district hospital satara
कॅलिफोर्नियातून आलेल्या या व्यक्तीचा १४ दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचारानंतर त्याचा पहिला कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, काल सकाळी या रुग्णाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. काल रात्री एनआयव्ही कडून रुग्णाच्या घशातील स्त्रावाच्या दुसऱ्या नमुन्याचे अहवाल मिळाले. त्यात रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅलिफोर्नियातून आलेल्या या व्यक्तीचा १४ दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचारानंतर त्याचा पहिला कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, काल सकाळी या रुग्णाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. काल रात्री 'एनआयव्ही'कडून रुग्णाच्या घशातील स्त्रावाच्या दुसऱ्या नमुन्याचे अहवाल मिळाले. त्यात रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू हा कोरोनासह तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
हेही वाचा-चिंताजनक : बाधिताचा मुलगाही पॉझिटिव्ह; सातारा जिल्ह्यात ५ रूग्ण