कराड (सातारा) - शनिवारी एकाच दिवसात 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कराडवरील चिंतेचे मळभ गडद झाले आहे. एकट्या कराडमधील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १६ आणि सातारा जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २६ झाली आहे.
कराडमधील 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 26 वर
शनिवारी एकाच दिवसांत 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कराडवरील चिंतेचे मळभ गडद झाले आहे. एकट्या कराडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ आणि सातारा जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २६ झाली आहे.
कराड तालुक्यातील बाबरमाची या गावातील रुग्णासोबत नागपूर-कराड असा प्रवास करणाऱ्यांमुळे कराडचा कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाबाधित पाच रूग्णांपैकी चार जण हे वनवासमाची (ता. कराड) या गावातील आहेत. बाधितांचा आकडा वाढत आहे. परंतु, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.