महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Outbreak In Satara: सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; प्रशासनाची चिंता वाढली

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या चोवीस तासात २४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता देखील वाढली आहे.

By

Published : Apr 11, 2023, 6:22 PM IST

Corona Outbreak In Satara
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

सातारा: जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये मास्क सक्ती करूनही मास्कचा वापर होताना दिसत नाही. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलने काळाची गरज आहे.

साताऱ्यात सर्वांत प्रथम मास्क सक्ती:इन्फ्लुएन्झा आणि कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे तसेच दोन कोविड रुग्णांच्या मृत्यूमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्ती केली गेली. देशात सर्व प्रथम सातारा जिल्ह्यात मास्क सक्ती झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आवर्जून मास्क वापरावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, कोठेच मास्कचा वापर होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


आरोग्य विभागाची चिंता वाढली:इन्फ्लुएन्झा आणि कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. आता कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार गेल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.


चोवीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह:गेल्या चोवीस तासात २४६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याचाच परिणाम म्हणजे सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १०७ झाली आहे.

कोरोनाचे हॉटस्पॉट : कोरोनाचा प्रसार वाढल्याने राज्यात 9 जिल्हे तर मुंबईमध्ये 24 विभागापैकी 6 विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

नागरिकांकडून चिंता व्यक्त: मुंबईसह राज्यात कोरोनाचा विषाणूचा प्रसार वाढायला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात 9 जिल्हे तर मुंबईमध्ये 24 विभागापैकी 6 विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे गरजेचे असल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नव्या व्हेरियंटचे रूग्ण वाढले : राज्यात कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील पुणे जिल्ह्यात 151, औरंगाबाद जिल्ह्यात 24, ठाणे जिल्ह्यात 23, कोल्हापूर जिल्ह्यात 11, अहमदनगर जिल्ह्यात 11, अमरावती जिल्ह्यात 8, मुंबईत 1, रायगड मध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत. एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून बाकी सर्व रुग्ण बरे झाले आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्ण आढळून आले आहेत, तेथे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णसंख्या वाढण्याचे कारण : जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना विषाणूने गेल्या तीन वर्षात स्वत:हून सातत्याने बदल घडवला आहे. व्हायरसमध्ये बदल झाल्यावर रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आताही व्हायरसने आपल्यामध्ये बदल केला आहे. नागरिकांनी लस घेऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे अँटीबॉडीजचा स्थर कमी झाला आहे. काही दिवसांनी नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज पुन्हा सक्रिय झाल्यावर रुग्णसंख्या आटोक्यात येईल. तो पर्यंत रुग्णसंख्या वाढताना दिसणार असल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखा सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.

हेही वाचा:Congress Leaders with Pilot : सचिन पायलट यांच्या उपोषणाला काँग्रेसच्या नेत्यांचीही साथ, अनेक नेत्यांचे समर्थन

ABOUT THE AUTHOR

...view details