महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनमधून शिथिलता; सार्वजनिक वाहतुकीसह मार्केट खुले - जिल्हाधिकारी शेखर सिंह

कोविड-19 विषाणू संसर्गाबाबत शासनाने सातारा जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनध्ये केलेला आहे. त्याअनुषंगाने सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहित केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्यास, तसेच सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्यास, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे.

corona lockdown satara update : Public transport market open in satara
सातारा जिल्ह्याला लॉकडाउनमध्ये मिळाली शिथिलता; सार्वजनिक वाहतूकीसह मार्केट खुले

By

Published : May 22, 2020, 1:31 PM IST

सातारा- राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, नॉन रेडझोनमध्ये स्थानिक परिस्थिनुरूप यामध्ये शिथिलता देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे सातारा जिल्ह्यातील नागरिकांनाही लॉकडाऊनमधून सशर्त शिथिलता देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्यास व सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्यास, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे.

कोविड-19 विषाणू संसर्गाबाबत शासनाने सातारा जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोमध्ये केलेला आहे. त्याअनुषंगाने सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास व सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्यास, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे (कंटेन्मेंट झोन) वगळून तसेच सातारा शहरातील 6 कंटेन्मेंट झोन तसेच पोवई नाका ते नगरपालिका रस्ता, नगर पालिका रस्ता ते राजवाडा (राजपथ), पोवई नाका ते शाहू स्टेडीयम रस्ता, एसटी स्टॅन्ड ते राधिका चौक (राधिका रोड), पोवई नाका ते पोलीस मुख्यालय मार्गे मोती चौक हे प्रतिबंधित रस्ते वगळून हे आदेश सर्व क्षेत्रासाठी लागू राहतील, असे सांगितलं आहे.

लॉकडाउनच्या शिथिलतेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी शेखर सिंह...
जिल्ह्यातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा वगळून सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. 65 वर्षांवरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध आहे. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिटयूट या बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा. या सेवा बंद राहतील. तथापी रेस्टॉरंटना त्यांच्या स्वयंपाकघरात पदार्थ तयार करुन घरपोच सेवा देता येतील. इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. अंत्यविधी व लग्न समारंभ या कार्यक्रमात 50 व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी राहील.क्रीडांगण, स्टेडियम व इतर सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शारिरिक व्यायाम व सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी राहील, यामध्ये दुचाकी वाहनावर 1 चालक, तीनचाकीत 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्तींना प्रवास करता येईल. सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर मास्कचा वापर न करणाऱ्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे तसेच सार्वजणिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.


जिल्ह्यात काय राहणार बंद -
सर्व चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, बार्स ॲन्ड ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल, मंगल कार्यालय हे सर्व बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद राहतील.



हेही वाचा -साताऱ्यातील पाटणमध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रशासकीय पातळीवर कडक उपाययोजना

हेही वाचा -चिकन खातंय भाव... कोंबड्या संपल्याना राव..., दिवसागणिक दरामध्ये मोठी वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details