महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटण तालुक्यात टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्सद्वारे तपासणी, आरोग्यसेविकांकडून घराघरात जाऊन सर्वेक्षण

सातारा जिल्ह्यात टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्समुळे ग्रामीण भागात  टेम्परेचर तपासणी वस्तुनिष्ठ होऊ लागल्याने आरोग्य सेवकांशी आतापर्यंत खोटे बोलणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडू लागले आहे. संबंधित गावात आरोग्यसेविकांकडून या मशीनद्वारे प्रत्येक संशयित व्यक्तीच्या घराघरात जाऊन टेम्परेचर तपासणी आणि श्वसनाचे ठोके तपासणी सुरू झाली आहे.

corona Inspection by temperature detective machines in Patan
पाटण तालुक्यात टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्सद्वारे तपासणी

By

Published : May 16, 2020, 12:10 PM IST

सातारा - टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्समुळे ग्रामीण भागात टेम्परेचर तपासणी वस्तुनिष्ठ होऊ लागल्याने आरोग्यसेवकांशी आतापर्यंत खोटे बोलणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडू लागले आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात सध्या ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अशा मशिन्स गावोगावी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेविका आणि अंगणवाडी सेविका ज्यावेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्याची माहिती घेतात तेव्हा बऱ्याच वेळा ताप असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली जाते. मात्र त्याचवेळी खासगी दवाखान्यातून संबंधित रुग्णाची नोंद होते. त्यामुळे रुग्णासंबंधी वस्तुस्थिती समोर येत नाही. परिणामी कोरोनाच्या संदर्भातील लक्षणांची योग्य चाचणी होत नाही.


त्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या आर्थिक निधीतून अशा प्रकारच्या टेम्परेचर डिटेक्टिव्ह आणि सिपीओ टू या मशीनच्या खरेदी करण्यासाठी परवानगी दिली असून अद्यापही पाटण तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी ही मशीन खरेदी केली नाहीत. मात्र, काही ग्रामपंचायतींनी अशा मशिन्स खरेदी केल्या असल्यामुळे त्या गावांतील रुग्णांची चांगल्या प्रकारे टेम्परेचर तपासणी सुरू झाली आहे.

तालुक्यातील नाडोली या ग्रामपंचायतीने अशा प्रकारच्या 3 मशिन्स खरेदी केल्या आहेत. तर नुकतेच पुणे येथील देवदूत डिजीटल्स पेमेंट्स या संस्थेकडून मल्हारपेठ आरोग्य केंद्राला टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशीन देण्यात आली आहे. आता संबंधित गावात आरोग्य सेविका यांच्याकडून या मशीनद्वारे प्रत्येक संशयित व्यक्तीचे घराघरात जाऊन टेम्परेचर तपासणी आणि श्वसनाचे ठोके तपासणी सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details