सातारा - जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. त्यामुळे, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
माहिती देताना नागरिक व जिल्हाधिकारी शेखर सिंह हेही वाचा -मराठा आरक्षण मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढा; उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागरिकांना आता कोरोना गेला असे वाटत आहे. त्यामुळे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे याचे प्रमाण वाढले आहे. लग्न समारंभात गर्दीतही लोक मास्क न वापरता सहभागी होताना दिसत आहेत. दुकानांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक व्यक्ती पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना साथरोगाच्या आनुशंगाने लोक गाफिल असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
रुग्णसंख्येत वाढ
जानेवारीत जिल्ह्यातील रोजचा रुग्णसंख्येचा आकडा २-३ पर्यंत खाली आला होता. तो पुन्हा १०० च्या घरात जाऊन पोहचला आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण रुग्णसंख्या 57 हजार 671 पर्यंत पोहचली आहे. 980 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 1 हजार 843 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. भाजी मंडया व लग्नसमारंभातील अनियंत्रित गर्दी सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न जटील करणारी ठरू शकते, अशी चिंता काही सजग नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शंका आल्यास चाचणी अनिवार्य
या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळावे. वयोवृद्ध नागरिकांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास नजिकच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, आपली टेस्ट करून घ्यावी. लवकर उपचार सुरू झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने शाळा व्यवस्थापकांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, त्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. प्रत्येक विद्यार्थी मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व शाळेत सामाजिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरून न जाता तत्काळ टेस्ट करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
हेही वाचा -मराठ्यांच्या राजधानीत साधेपणाने शिवजयंती; कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांचे आवाहन