सातारा - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत-जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहकारी संस्थांनी मदत करावी; सहकार मंत्र्यांचे आवाहन
कोरोना संसर्गाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आपल्या देशात सर्व प्रकारचे उत्पादन थांबले आहे, उद्योग बंद आहेत, लहान व्यवसायांवर गंडांतर आले आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत-जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरोना संसर्गाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आपल्या देशात सर्व प्रकारचे उत्पादन थांबले आहे, उद्योग बंद आहेत, लहान व्यवसायांवर गंडांतर आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ज्या-ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती ओढवली होती. त्यावेळी विविध सहकारी संस्था, दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती, याची आठवणही पाटील यांनी करून दिली.
पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, ऑईल मिल यांच्या माध्यमातून माध्यमातून अनेकांच्या जीवनात अर्थिक परिवर्तन घडले आहे. राज्यात 475 नागरी बँका, 13 हजार 559 नागरी पतसंस्था, सात हजार 253 कर्मचारी पतसंस्था, 21 हजार 425 विकास सोसायट्या, 95 हजार 468 सहकारी गृहनिर्माण संस्था, 215 साखर कारखाने, 67 सहकारी दूध संघ आहेत. इतक्या संस्थांद्वारे सहकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे. संस्थेच्या नफ्याच्या किती टक्के रक्कम मदत करावी, याचीही तरतूद सहकार कायद्यात आहे. कोरोनाच्या साथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.