सातारा -सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरण, तलावांच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ ( Water Increase In dams )होताना पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे.
महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस -महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार ( Rain In Maharashtra ) आहे. दमदार पावसामुळे महाबळेश्वर गारठले आहे. पावसामुळे कोयना धरणाच्या जलाशयात देखील मोठी वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजापेक्षा महाबळेश्वरमध्ये जास्त म्हणजे 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर महाबळेश्वरमध्ये 1,243 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
वेण्णा लेक ओव्हरफ्लो - संततधार पावसामुळे महाराष्ट्राच्या मिनी काश्मिरमधील ( Mini Kashmir ) वेण्णा लेक तुडूंब भरला ( Venna Lake filled up ) आहे. हा तलाव आता ओसंडून भरून वाहताना दिसत आहे ( Venna Lake Overflow ) . तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला बोट व्यावसायिक आपल्या बोटी किनार्याला आणून ठेवताता. या बोटीदेखील आता वेण्णा लेकच्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरचा परिसर हिरवा गर्द झाला आहे. धुवांधार पाऊस, धुके, फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.