महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2020, 7:41 PM IST

ETV Bharat / state

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

मोदी सरकारने कृषी व शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेल्या अन्यायकारक 3 कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निर्दशने व आंदोलने करत आहे.

protest
काँग्रेसचे आंदोकाँग्रेसचे साताऱ्यात आंदोलनलन

सातारा - दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकरी राजाला पाठिंबा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस मुख्यालयासमोर आज मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने करण्यात आली.

काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन

मोदी सरकारने कृषी व शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेल्या अन्यायकारक 3 कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निर्दशने व आंदोलने करत आहे. त्याला पाठिंबा दर्शवत हे आंदोलन असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मोदी सरकार उद्योगपती धार्जिणे

जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा धनश्री महाडिक म्हणाल्या, मोदी सरकार उद्योगपती धार्जिणे सरकार आहे. अच्छे दिनच्या भूलभुलैय्यात जनतेने मोदी नावाच्या हुकूमशहाला पंतप्रधान बनवले ही सगळ्यात मोठी घोडचूक झालेली आहे. देशातील सरकारी मालमत्ता अंबानी - अदानी यांच्या घशात घालणारा पंतप्रधान जगाला भाकरी देणाऱ्या बळीराजाचा विचार करू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

संयुक्त किसान संघर्ष समितीचे धरणे

यावेळी प्रदेश कार्यकारीणीच्या सदस्य रजनीताई पवार, सुषमा राजेघोरपडे, मनोजकुमार तपासे, अन्वर पाशा खान, माधुरी जाधव, अॅड. दत्तात्रय धनावडे, रझिया शेख, रिजवान शेख, सूरज कीर्तिकर, शरद मोरे, सुरेश कुंभार, संतोष डांगे, अभय कारंडे, पांडुरंग पवार, शिवाजी जाधव इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, संयुक्त किसान संघर्ष समितीतर्फेही दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details