सातारा -आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढवणार असून आघाडीतील मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्याचा ठराव झाला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिली. काही जागांची अदला बदलही होवू शकते तसेच आघाडीत मनसे असेल की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल, असा आरोपही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
हे ही वाचा -विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार