महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड विभाग आवश्यक - पृथ्वीराज चव्हाण  - Satara corona news

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड विभागाची व्यवस्था उपलब्ध करावी, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठकीत केली.

सातारा कोरोना न्यूज
आढावा बैठक घेताना पृथ्वीराज चव्हाण

By

Published : May 26, 2021, 7:10 PM IST

कराड - कोरोनानंतर बरे झालेल्यांची नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड विभागाची व्यवस्था उपलब्ध करावी, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठकीत केली.


कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात कराड दक्षिणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे उपस्थित होते.

आरोग्य केंद्रांच्या अडचणी समजून घेतल्या
पृथ्वीराज चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अडचणी समजून घेतल्या. सध्या सुरू असलेल्या लसीकरण, कोरोना रुग्ण तपासणीचाही आढावा घेतला. कोरोनातून बरे झालेल्यांची नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोस्ट कोविड विभागाची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.

दुसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे आरोग्य यंत्रणेने काळजी घेतली होती. तसे दुसर्‍या लाटेत दिसत नाही. कोरोना साथ गेल्याचे समजून सर्व यंत्रणा शांत झाल्याने दुसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली आहे. अशी अवस्था तिसर्‍या लाटेत होऊ नये, यासाठी आतापासूनच काळजी घेणे आवश्यक असल्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होत असल्याचे तत्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड आणि स्वतंत्र बेडची व्यवस्था करून ठेवावी, अशी सूचना देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details