कराड (सातारा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे देशाचे आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणात मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच मोदींचे परराष्ट्र धोरण दिशाहीन असल्याचेही ते म्हणाले.
'नरेंद्र मोदींमुळे देशाचे अर्थिक, सामाजिक अन् परराष्ट्र धोरणात मोठे नुकसान' - पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे देशाचे आर्थिक, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणात मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मोदी सरकारकडून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर चव्हाण यांनी हा एक जुमला असल्याचे म्हटले होते. जीडीपीच्या केवळ एक टक्के इतकाच खर्च सरकार करत असल्याचे ते म्हणाले. जागतिक प्रमुख 10 वित्तीय संस्थांच्या म्हणण्यानुसार या पॅकेजमधून वास्तविक खर्च केवळ 0.7 ते 1.05 टक्के होऊ शकतो. त्यामुळे हे पॅकेज निव्वळ पोकळ आहे. 2008 सालच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्याचे नेतृत्व देशाकडे होते. मात्र, सध्या सरकारमधील कोणाकडूनच काही अपेक्षा उरल्या नसल्याचे चव्हाण म्हणाले.