सातारा - भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे सनसनाटी चर्चा करण्यापलीकडे काहीच काम नाही. कॉंग्रेसचा विचार तळागाळात रूजलाय पक्ष अद्याप शाबूत आहे. आमची ध्येयधोरणे व कार्यपध्दती यासाठी भाजपच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, अशी सणसणीत टीका राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस पक्ष संपलेला नाही, गावागावात आजही काँग्रेस पक्षाचा विचार आजही आहे. आता नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना ताकद देण्याचे काम आम्ही करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काँग्रेस संपलेली नाही
आमच्या कामाला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही; गृहराज्यमंत्री सतेज पाटलांची साताऱ्यात टोलेबाजी - satej patil salm bjp
मागच्या पाच वर्षात आमच्यातील किती लोक दुसऱ्या पक्षात गेलेत, तीच काँग्रेसची ताकद होती. दुर्दैवाने आम्ही ज्यांना मोठे केले तेच आमच्यापासून लांब गेले. हे राजकारणात घडत असते. नवीन लोक तयार करणे पक्षाला उभारणी देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. काँग्रेस पक्ष म्हणून विचारधारा ही गावागावात निश्चितपणे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपलेला नाही.
जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष बॅकफुटला गेला असून त्याला ऊर्जितावस्था देणे गरजेचे असल्याची भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, पक्ष संघटना वाढविणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण यादी घेऊन बसलो तर मागच्या पाच वर्षात आमच्यातील किती लोक दुसऱ्या पक्षात गेलेत, तीच काँग्रेसची ताकद होती. दुर्दैवाने आम्ही ज्यांना मोठे केले तेच आमच्यापासून लांब गेले. हे राजकारणात घडत असते. नवीन लोक तयार करणे पक्षाला उभारणी देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. काँग्रेस पक्ष म्हणून विचारधारा ही गावागावात निश्चितपणे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपलेला नाही. पक्षाची मते आणि पक्षाला मानणारा वर्ग निश्चितपणे गावागावात आहे. आता नव्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे."
'त्या' का भाजपात गेल्या सर्वांना माहिती-
राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत. ते जनतेला माहितच नाहीत, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मुळात त्यांना बोलायचा अधिकार आहे का हा प्रश्न आहे. त्या कोणत्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गेल्या हे सर्वांना माहिती आहे. काही तरी सनसनीखेज आरोप करून चर्चेत राहणे याच्या पलिकडे त्या काहीही काम करत नाहीत. आम्ही काय काम करतोय हे राज्यातील लोकांना माहिती आहे, त्यामुळे त्यासाठी भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे नव्हे २५ वर्षे शंभर टक्के टिकेल, असे वक्तव्यही त्यांनी केले.