महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांकडे प्रचार रणनीतीची जबाबदारी असलेल्या तिन्ही राज्यांत काँग्रेसला अपयश - Congress Failed to won election prithviraj chavan

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Senior Congress Leader Prithviraj Chavan ) यांच्यावर उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोवा राज्याच्या निवडणूक प्रचार रणनीतीची जबाबदारी होती. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिन्ही ठिकाणी काॅंग्रेसला मोठे अपयश आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालाने काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ( Congress Defeat in Five Assembly Elections )

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Mar 11, 2022, 6:14 PM IST

कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Senior Congress Leader Prithviraj Chavan ) यांच्यावर उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोवा राज्याच्या निवडणूक प्रचार रणनीतीची जबाबदारी होती. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिन्ही ठिकाणी काॅंग्रेसला मोठे अपयश आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालाने काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ( Congress Defeat in Five Assembly Elections )

गोव्यात काॅंग्रेस बहुमतापासून दूरच -

काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार त्यांनी उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकीत व्हर्चुअल पत्रकार परिषदा तसेच प्रचार सभा घेतल्या होत्या. काँग्रेसचे ते स्टार प्रचारक होते. गोव्यात काॅंग्रेसला विजयाची खात्री होती. मात्र, काॅंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही.

हेही वाचा -Disha Salian Case : राणे पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार! FIR रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव

साताऱ्यातील भाजप पदाधिकारी होते प्रचारात -

साताऱ्यातील भाजप पदाधिकारी गोवा निवडणुकीच्या प्रचारात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गोव्याला गेले होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात सभा घेतली होती. डॉ. सावंत हे विजयी झाल्यामुळे साताऱ्यातील भाजपच्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details