सातारा - काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप येळगावकर उपस्थित होते.
काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसलेंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
माजी आमदार मदन भोसले यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाई येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी आमदार मदन भोसले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये भोसले यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले होते. त्यावर आज भुईंज येथील किसनवीर कारखान्यावरील कार्यक्रमात माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाषणात मदन भोसले यांचा उल्लेख माजी आणि भावी आमदार असा केला. यावेळी उपस्थितांमधून मोठ्या प्रमाणावर भाजप पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या.