सातारा - काँग्रेसची भूमी म्हणून सातारा मला माहित आहे. मात्र, काँग्रेसने येथील नेत्यांचा कधीच सन्मान केला नाही. यशवंतराव चव्हाणांसारख्या नेतृत्वालाही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत शाह बोलत होते.
देशात काँग्रेसची सत्ता असताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला निधी मिळत असे. या निधीमध्ये देखील काँग्रेसकडून भ्रष्टाचार होत असे. शहीदांच्या पत्नींसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीतील फ्लॅटसुध्दा काँग्रेसच्या नेत्यांनी विकले, अशी टीका शाहांनी केली.