कराड- नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात तसेच जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेस, युवक काँग्रेस आणि अल्पसंख्यांक सेलच्यावतीने कराड येथील दत्त चौकात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने आणलेले विधेयक जनतेच्या विरोधातील विधेयक आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णायविरोधात वेळोवेळ आम्ही आंदोलन करू, असे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात कराडमध्ये काँग्रेसचे आंदोलन - कराड
देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली असताना मूळ विषयाला बगल देण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. सरकारच्या देशविरोधी निर्णयांना काँग्रेस विरोध करेल, असे यावेळी आंदोलक म्हणाले.
मोदी सरकारने आणलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक हे नागरिकांच्या विरोधातील विधेयक असून त्याला विरोध करणार्या जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या दोन्ही घटनेचा काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व सेलच्यावतीने आम्ही निषेध करत आहोत, असे काँग्रेसचे इंद्रजीत चव्हाण म्हणाले. संपूर्ण देशात विधेयकाला होणारा विरोध लक्षात घेऊन मोदी सरकारने हे विधेयक मागे घ्यावे. देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली असताना मूळ विषयाला बगल देण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. सरकारच्या देशविरोधी निर्णयांना काँग्रेस विरोध करेल, असेही चव्हाण म्हणाले.
आंदोलनात राहूल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, प्रदीप जाधव, आबा सूर्यवंशी, वैभव थोरात, अमित जाधव, धनराज शिंदे, समीर पटवेकर, मुकुंद पाटील, दत्तात्रय मोरे, राहुल पवार, नितिन पाटील, सूरज एटम, सूरज जगताप, संतोष जगताप, विक्रम पाटील, अभिजीत चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.