पाटण तालुक्यात कडकडीत बंद, सद्यस्थितीत दिलासादायक वातावरण - उपविभागीय अधिकारी - corona update maharashtra
तब्बल सव्वा महिन्याहून अधिक काळ पाटण शहर व तालुक्यात लाॅकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात समोर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून कराडसह पाटण शहर, तारळे, मल्हारपेठ, नाडे-नवारस्ता, ढेबेवाडी, तळमावले आटी बहुतांशी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा - जिल्ह्यात व प्रामुख्याने कराड तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवार (२६ एप्रिल) पासून पाटण तालुक्यातील अनेक गावात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे पाटणसह मोठ्या गावांमधीव बाजारपेठा बंद आबेत फक्त रुग्णालय आणि घरपोच औषध सेवा सुरू असून संचारबंदीमुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाटण तालुक्यात दिलासादायक वातावरण असल्याचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले.
तब्बल सव्वा महिन्याहून अधिक काळ पाटण शहर व तालुक्यात लाॅकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात समोर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून कराडसह पाटण शहर, तारळे, मल्हारपेठ, नाडे-नवारस्ता, ढेबेवाडी, तळमावले आटी बहुतांशी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्याचे आदेश दिले आहेत. तरीही मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांमुळे कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. मात्र, त्यावर देखील प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. त्याला नागरिक देखील सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना तालुक्यात दिलासादायक स्थिती आहे. यापुढे देखील नागरिकांनी असचे सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे. तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील आदींसह नगरपंचायत चांगले काम करीत असून कोरोनाची लढाई जिंकू, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.