सातारा - कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पाटण नगरपंचायत क्षेत्र आणि पाच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
पाटणसह सहा गावे रविवारी मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करणार - सातारा कोरोना अपडेट
पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पाटण शहरासह ढेबेवाडी, तळमावले, मल्हारपेठ, नाडे (नवारस्ता) आणि तारळे या पाच गावाच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परिसरात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.
पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पाटण शहरासह ढेबेवाडी, तळमावले, मल्हारपेठ, नाडे (नवारस्ता) आणि तारळे या पाच गावाच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परिसरात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णालय, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, उद्योग सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एका वेळी दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. अत्यावश्यक सेवेतील फक्त औषधे, घरगुती गॅस सिलिंडर आणि दूध घरपोच पुरविण्याबाबत यंत्रणा उभारण्याचे आदेश प्रांतिधिकाऱ्यांना दिले आहेत.