महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील पाटण तालुक्यात खासगी सावकारीप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल - सातारा खासगी सावकारी प्रकरण

आरोपी एकनाथ अंतू जाधव, विठ्ठल लक्ष्मण पाटील, गणेश जाधव व सोन्या आनंदा निकम (सर्व रा. बिबी, ता. पाटण) यांनी सावकारी व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने दिले होते. त्यापोटी नवनाथ बोलके 5 हजार रुपये महिन्यास देत होते. दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्यादीकडून रक्कम रुपये 65 हजारांचा चेक लिहून घेऊन तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेण्यात आल्या होत्या.

private lending
खासगी सावकारीप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Feb 12, 2020, 1:11 AM IST

सातारा - सावकारी व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना पाटण तालुक्यात खासगी सावकारीची दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. या दोन वेगवेगळ्या प्रकरणात 8 जणांविरोधात पाटण व कोयनानगर पोलिसात खासगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

फिर्यादी नवनाथ आनंदा बोलके (वय 54 रा. बिबी, ता. पाटण) यांना संशयित आरोपी एकनाथ अंतू जाधव, विठ्ठल लक्ष्मण पाटील, गणेश जाधव व सोन्या आनंदा निकम (सर्व रा. बिबी, ता. पाटण) यांनी सावकारी व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने दिले होते. त्यापोटी नवनाथ बोलके 5 हजार रुपये महिन्यास देत होते. दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्यादीकडून रक्कम रुपये 65 हजारांचा चेक लिहून घेऊन तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेण्यात आल्या होत्या. तसेच 'तू मुद्दल व व्याज दिले नाही तर तुझे हातपाय तोडून टाकीन' अशी धमकीही फिर्यादी बोलके यांना देण्यात आली होती. त्यामुळे बोलके यांनी पाटण पोलिसात वरील संशयिताविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वरील संशयित चार जणांविरोधात पाटण पोलिसात बेकायदेशीर सावकारी केली म्हणून भा.द.वि. कलम 504, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सपोनि तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोतपागर करत आहेत.

तसेच कोयना विभागातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी असणाऱ्या नानेल या गावात राहणाऱ्या विठ्ठल सदाशिव यमकर (42) या युवकाने दोन वर्षापूर्वी 10 टक्के व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले कर्ज फेडुन सुध्दा अजून पैशाची मागणी करून खाजगी सावकारी कर्ज घेणाऱ्या युवकाला मारहाण करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोयना पोलीस स्ठेशनला पाटण तालुक्यातील 4 खाजगी सावकाराविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. कोयना विभागातील नानेल या गावातील विठ्ठल सदाशिव यमकर (42) या गवळी समाजातील युवकाने दोन वर्षापूर्वी वडीलांच्या मेंदूच्या ऑपरेशनसाठी व पाळीव जनावरे विकत घेण्यासाठी पाटण रामापूर येथील दिलीप विष्णू पाटील (वय 42) याच्याकडून 10 टक्के व्याजाने 1 लाख रुपये घेतले होते. याबदल्यात त्याने आतापर्यंत 2 लाख 35 हजार रुपये दिले आहेत. सर्व पैसे देऊन सुध्दा खाजगी सावकार दिलीप पाटील हा विठ्ठल यमकर यांच्याकडे अजून 1 लाख 20 हजारांची मागणी करत होता.

विठ्ठल सदाशिव यमकर याने सुनील गंगाराम यमकर व चंद्रकांत रामचंद्र जाधव (दोघे रा.मारुल तर्फ पाटण) या दोन खाजगी सावकरांकडून 10 टक्के व्याजाने 80 हजार रुपये तर रामचंद्र बावधाने (रा. पिंपळोशी) यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले होते. 10 टक्के व्याजाने घेतलेले सर्व पैसे परत देऊन सुध्दा हे सर्व जादा पैसे मागणी करत होते. तसेच पैसे न दिल्यास जनावरे घेऊन जाण्याची व जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे विठ्ठल यमकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात महाराष्ट्र सावकार अधिनियम कायदा कलम सन 30 व भा.द.वि.सकलम-504, 506, 35 प्रमाणे कोयनानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदा एस.आर.चव्हाण करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details