सातारा -भारतातील प्रत्येक गावाचे काहीनाकाही वैशिष्ठ्य असते. साताऱ्यामधील माण तालुक्यातही अनेक गावे आपल्या विविध परंपरांमुळे ओळखली जातात. या माण तालुक्यात दिवाळी - पाडव्यानिमित्त मेढरांना रंगरंगोटी करुन गावातून मिरवणूक काढण्याची पारंपारिक प्रथा आजही सुरु आहे.
साताऱ्यात मेढरांना रंगरंगोटी करुन मिरवणूक हेही वाचा -अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार - जिल्हाधिकारी
माण तालुक्यातील गटेवाडी, नरबटवाडी, पुकळेवाडी, बनगरवाडी, मासाळवाडी, विरकरवाडी अशी अनेक गावे धनगर समाजाच्याच लोकसंख्येची आहेत. या समाजाचा मेष पालन हाच पारंपारिक व्यवसाय असल्याने येथे दरवर्षी मेंढरे पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
यंदाही दिवाळी पाडव्या निमित्त गावातील मेंढरे रंगवून आणि कळपा- कळपाने मिरवणूक काढुन येथील ग्रामदैवत मंदीर परिसरास प्रदक्षिणा घालण्यात आली.
मेंढरांचे कळप पळविण्याच्या (शर्यतीचे) आयोजन करण्यात आले होते. मेंढरांना स्पर्धेत स्फूर्ती देण्यासाठी हलगी ताशा ही वाद्येही वाजविण्यात आली. वरकुटे-मलवडी येथेही विविध मान्यवरांच्या उपस्थित याच पध्दतीने मेंढरे पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.