सातारा- कोयना धरण व्यवस्थापनाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही त्यांनी नैसर्गिक व तांत्रिक परिस्थितीवर मात करत आजवर केलेले नियोजन हे निश्चितच कौतुकास्पद आहे. येथे कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढण्यासोबतच प्रलंबित अन्य प्रश्नांचीही लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाटण तालुका दौरा केला. यावेळी त्यांनी कोयना धरण, नेहरू उद्यान, कोळकेवाडी टप्पा तीन प्रकल्प, आपत्तकालीन घाट रस्ता, धरण उपकरणे आदी ठिकाणी भेटी देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी कोयना सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पंचायत समिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयना व्यवस्थापन उपअभियंता कुंभार, कोळकेवाडी प्रकल्प उपअभियंता भंगाळे आदी अधिकारी उपस्थित होते.