सातारा - पुण्या-मुंबईहून गावी परतलेले लोक सर्वेक्षणासाठी दारावर आलेल्या कर्मचऱ्यांपासून स्वत:च्या आजाराची लक्षणे लपवत आहेत. अशा लोकांचा मुर्खपणा पुढे समाजासाठी घातक ठरू शकतो. अशांवर गुन्हे दाखल करु, असा कळकळवजा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लोकांनी घाबरुन जाण्यासारखी नसली तरी, आजपर्यंत घेतली त्याहून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हावासियांना उद्देशून केले. ते म्हणाले, ताप, खोकला, सर्दी, श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे जाणवल्यास नजिकच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा.
सातारा जिल्हा कोरोना सद्यस्थिती -
क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय - 464, कृष्णा हॉस्पीटल कराड - 318
एकूण दाखल रुग्ण - 782