महाराष्ट्र

maharashtra

Cold Weather in Satara : साताऱ्यात थंडीचा कडाका कायम, धुके आणि वाफांमुळे नद्या गोठल्याचा भास, पाहा व्हिडिओ

By

Published : Jan 13, 2023, 10:55 PM IST

तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. महाबळेश्वरात सलग दोन दिवस दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण नदीपात्र वाफाळून जात आहे. पांढऱ्या शुभ्र नदीपात्रामुळे कोयना, कृष्णा नद्या बर्फाच्छादित भासत आहेत.

Cold Weather in Satara
साताऱ्यात धुक्याची चादर

हिवाळ्यातील धुके आणि वाफांमुळे नद्या गोठल्याचा भास

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीची लाट आल्याचे पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्ह्यात देखील गेल्या तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम आहे. महाबळेश्वरात सलग दोन दिवस दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. नदीकाठच्या गावांना देखील हुडहुडी भरली आहे. पहाटे नदीच्या पाण्यातून निघणाऱ्या वाफांमुळे नद्या गोठल्याचा भास होत आहे. शेत शिवारे दवबिंदूंनी ओली चिंब होत आहेत.

नद्या गोठल्याचा आभास : पहाटेच्या सुमारास नदीच्या पाण्यातून वाफा निघताना पाहून नदी गोठल्याचा भास होत आहे. संपूर्ण नदीपात्र वाफाळून जात आहे. पांढऱ्या शुभ्र नदीपात्रामुळे कोयना व कृष्णा नद्या बर्फाच्छादित भासत आहेत.

साताऱ्यात धुक्याची चादर


रक्त गोठवणारी थंडी : गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्याचा पारा कमालीचा घसरल्याने थंडीचा कडाका कायम आहे. महाबळेश्वरात सलग दोन दिवस दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात सगळीकडे कडाक्याची थंडी आहे. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता वाढत आहे. रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे.

साताऱ्यात धुक्याची चादर


दवबिंदूंनी शिवारे ओली चिंब : मोठ्या प्रमाणात धुके पडत असून शेत शिवारे धुक्यात हरवून जात आहेत. दवबिंदुंमध्ये पिके न्हाऊन निघत आहेत. धुक्यामुळे शेतीच्या कामावर देखील परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या थंडीचा परिणाम सर्वच घटकांवर झाल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details