सातारा : कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेशवरमधील तापमानात घट झाली आहे. महाबळेश्वरमध्ये 12 तर वेण्णा लेक परिसरातील तापमान 9 अंगावर आल्याचे पाहायला मिळाले. महाबळेश्वरच्या या थंड वातावरणाचा पर्यटक सध्या चांगलाच आनंद लुटत आहेत. सुट्टीमुळे सध्या महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर गारठले : ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरचे तापमान खालावले आहे. महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस तर वेण्णालेक परिसरातील तापमान 9 अंशावर आले आहे. मागील आठवड्यात याच परिसरात दवबिंदूंचे हिमकणात रूपांतर झाले होते. लिंगमळा, वेण्णा लेक या परिसरातील थंड वातावरण पर्यटकांना सुखावते. सध्याच्या कडक उन्हात देखील महाबळेश्वरमध्ये थंडी जाणवत असल्याने पर्यटक या थंडगार वातावरणाचा आनंद लुटत आहेत.
धुके आणि थंडीचा नजारा :मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने झोपडल्यानंतर सातारा जिल्ह्यातील तापमानात घट झाली होती. दिवसभर कडक उन्हाळा जाणवत असला तरी पहाटे कडाक्याची थंडी आणि धुके देखील पाहायला मिळाले. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरातील किमान तापमानात मोठी घट होऊन दवबिंदू गोठल्याचे चित्र मार्च महिन्याच्या शेवटी पाहायला मिळाले.