महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Shinde On Sanjay Raut : विरोधकांकडे आरोप करायचंच काम उरलंय; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला - एकनाथ शिंदे आणि संजय राऊत

Eknath Shinde On Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज प्रत्युत्तर दिलंय. सकाळी झोपेतून उठले की दुसऱ्यावर आरोप करणं एवढंच काम त्यांना उरलंय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी खासदार राऊतांना लगावला आहे.

Eknath Shinde On Sanjay Raut
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:21 PM IST

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा Eknath Shinde On Sanjay Raut :एल्विश यादव (Elvish Yadav) संदर्भात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CMEknath Shinde) यांनी दरे (ता. महाबळेश्वर) येथे माध्यमांशी बोलताना उत्तर दिलंय. विरोधकांना काही कामधंदा राहिलेला नाही. सकाळी झोपेतून उठले की, दुसऱ्यावर आरोप करणं एवढंच काम त्यांना उरलंय, असा टोला मुख्यमंत्र्यांनी खासदार राऊतांना लगावला आहे.



आम्ही कामातून उत्तर देतो : बांबू लागवड आणि कोयना धरणातील वॉटर स्पोर्ट्स या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आपल्या दरे गावी आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही झाडं‌ लावतोय, पण त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. दुसऱ्यावर आरोप करणे एवढंच त्यांना काम उरलंय. आम्ही कामातून उत्तर देतोय.



मराठा आरक्षणासाठी एकदिलाने काम करू : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी दिवस-रात्र काम करू. सत्तेतील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आरक्षणाच्या बाबतीत बोलणं झालं आहे. सर्वजण एक दिलानं काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकारला वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांना धन्यवाद दिले आहेत.



लोकसभेला ४५ जागा जिंकू : येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही केलेलं काम पाहुन लोक मतदान करतील. त्यामुळे ४५ जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बांबू लागवड केली. शेतकऱ्यांनी बांबू लागडीकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन देखील केले.

हेही वाचा -

  1. Elvish Yadav : एल्विश यादवचं महाराष्ट्र कनेक्शन; कोटा पोलिसांनी पकडलं, चौकशी केली अन्
  2. Devendra Fadnavis : एल्विश यादव प्रकरणावरुन संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
  3. Sanjay Raut On Eknath Shinde : 'ड्रग्ज प्रकरणाची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?' राऊतांचा खोचक सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details