महाराष्ट्र

maharashtra

Death anniversary of Yashwantrao Chavan : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त (Death anniversary of Yashwantrao Chavan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली (tribute to late Yashwantrao Chavan) वाहिली.

By

Published : Nov 25, 2022, 2:05 PM IST

Published : Nov 25, 2022, 2:05 PM IST

Death anniversary of Yashwantrao Chavan
यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी

सातारा : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त (Death anniversary of Yashwantrao Chavan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली (tribute to late Yashwantrao Chavan) वाहिली.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली



मान्यवर उपस्थित :यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, तहसीलदार विजय पवार आदी मान्यवर उपस्थित (tribute to Yashwantrao Chavan) होते.


समाधीस्थळी आदरांजली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधी परिसरातील पर्णकुटी समोर बसून महिला मंडळाच्या भजन गायनाचा आस्वाद घेतला. भजनी मंडळाच्या महिलांसोबत छायाचित्र काढून त्यांची इच्छा पूर्ण केली. समाधीस्थळी आदरांजली वाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमाची देखील पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा यशवंत कृषी औद्योगिक प्रदर्शनाकडे रवाना (paid tribute to late Yashwantrao Chavan) झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details