सातारा: माण तालुक्यातील म्हसवड येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या दहा वर्षांच्या बालकाचा अंगावर कपाट पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. परंतु, म्हसवड कोविड सेंटर मध्ये असणाऱ्या सुविधा आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
डोक्याला मार लागल्याने झाला मृत्यू
रिहान अमीर मुल्ला असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. म्हसवड कोविड सेंटर मध्ये असणाऱ्या सुविधा आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसवड येथे कोरोना केअर सेंटर असून, तेथे कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. या सेंटरमध्ये रिहान अमीर मुल्ला (वय 10 रा. म्हसवड ता.माण) याच्यावरही उपचार सुरू होते. केंद्रात त्याच्या अंगावर कपाट पडले. यात डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली. पोलीस नाईक आर.डी. कुंभार अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -जिल्ह्यात 'म्युकर मायकोसिस'चे आणखी पाच बळी; मृतांची संख्या 24 वर