सातारा : महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे ( Chief Ministers wife ) यांनादेखील बसला. वेण्णालेक परिसरातील वाहतूक कोंडीत त्यांना तब्बल दीड तास त्यांना अडकून पडावे लागले. लिंगमळा ते वेण्णालेक रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील दरे ( CM Eknath Shinde village ) गावी जायला त्यांना विलंब झाला.
मिसेस मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकल्या दीड तास, गावाला जायला झाला उशीर - Chief Ministers wife got stuck
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे ( Lata Shinde in traffic stuck ) शुक्रवारी रात्री महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी गावी येत होत्या. लिंगमळा ते वेण्णालेक मुख्य रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना अडकून पडावे लागले. दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यात वेण्णालेक परिसरात केवळ दोन पोलीस वाहतुकीचे ( Mahabaleshwar traffic jam issue ) नियंत्रण करत होते.
![मिसेस मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकल्या दीड तास, गावाला जायला झाला उशीर मिसेस मुख्यमंत्री वाहतूक कोंडीत अडकल्या दीड तास](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16773204-thumbnail-3x2-traffic.jpg)
वाहतूक नियंत्रणासाठी केवळ दोन पोलीसमुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे ( Lata Shinde in traffic stuck ) शुक्रवारी रात्री महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी गावी येत होत्या. लिंगमळा ते वेण्णालेक मुख्य रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना अडकून पडावे लागले. दिवाळी सुट्टीमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यात वेण्णालेक परिसरात केवळ दोन पोलीस वाहतुकीचे ( Mahabaleshwar traffic jam issue ) नियंत्रण करत होते. त्यामुळे लता शिंदे यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. दीड तासानंतर त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
पर्यटकांसह स्थानिकांनाही वाहतूक कोंडीचा त्राससध्या दिवाळी सुट्टी असल्याने मॅप्रो गार्डनजवळ होणारी वाहतूक कोंडी आणि महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताना वेण्णा लेककडून महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मखारिया गार्डन, एसटी स्टॅन्ड परिसर, बाळासाहेब ठाकरे चौक, मस्जित रस्ता, सुभाष चौक, शिवाजी चौक, मरी पेठ परिसर, आराम खिंड, ऑर्थरसीट पॉईंट, केट्स पॉईंट या प्रेक्षणीय स्थळांच्या परिसरात देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.