सातारा : आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) आणि बच्चू कडू यांच्यातील वाद, महाराष्ट्रातून गाशा गुंडाळून गुजरातला जात असलेल्या प्रकल्पांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तसेच दरे या आपल्या गावी ते मुक्काम करणार आहेत.
Eknath Shinde Satara Visit : मुख्यमंत्री आज सातारा जिल्ह्याच्या खासगी दौऱ्यावर; मूळगावी करणार मुक्काम - Chief Minister today on private tour
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आज मुंबई येथून हेलिकॉप्टरने महाबळेश्वरकडे प्रयाण केले आहे. महाबळेश्वर येथून मोटारीने तापोळा येथे आल्यानंतर लॉन्चने दरे या त्यांच्या गावी जाणार आहेत. आज त्यांचा दरे येथे मुक्काम आहे.
मुख्यमंत्र्यांचा आज दरे गावी मुक्काम :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १२.३० वाजता मुंबई येथून हेलिकॉप्टरने महाबळेश्वरकडे प्रयाण करणार आहेत. महाबळेश्वर येथून मोटारीने तापोळा येथे आल्यानंतर लॉन्चने दरे या त्यांच्या गावी जाणार आहेत. आज त्यांचा दरे येथे मुक्काम आहे. हा संपूर्ण दौरा खाजगी आहे. महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्या टप्प्यावर आले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासगी दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री अचानक दौरावर येत असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने राणांकडून घेण्यात आली माघार : मागील अनेक दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला होता अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर आज रवी राणा यांच्याकडून माघार घेण्यात आली आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री यांची २० मिनिटे त्यांच्या सागर या निवस्थानी भेट घेतल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत माझ्याकडून कोणी दुखावले गेले असल्यास मी माझे शब्द परत घेतो, असे सांगितले आहे.