सातारा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या दरे या मूळ गावी येत आहेत. ते आज आणि उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर ( Eknath Shinde Satara visit ) आहेत. गुरूवारी (दि. ११) दुपारी १२ वाजता ते मुंबईतून मोटारीने दरे (ता. महाबळेश्वरकडे) रवाना होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता त्यांचे दरे येथे आगमन होईल. मुंबईतील कार्यक्रम आटोपून साताऱ्याकडे रवाना होणार होणार ( Eknath Shinde Dare village visit ) आहेत.
मुंबईत सकाळी १०.३० वाजता विधानसभा कामकाज सल्लागार समिती बैठक होईल. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठक आहे. सकाळी ११.३० वाजता मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा ध्वज प्रदान कार्यक्रम आटोपून दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता त्यांचे दरे गावी आगमन होईल.
मुख्यमंत्र्यांचा आज दरे गावी मुक्काममुख्यमंत्री गुरूवारी आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) या मूळ गावी मुक्कामी आहेत. पावसाळी अधिवेशनापुर्वी ग्रामदैवत आणि कुलदैवताचे ते दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्याबद्दल दरे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार ( Eknath Shinde village ) आहे. शुक्रवारी (दि. १२) दुपारी १ वाजता ते दरे येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रूपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. ( CM Eknath Shinde Son of Satara District )