महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivtirtha At Satara शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी ८ कोटींचा निधी, सातार्‍याच्या ऐतिहासिक वैभवात पडणार भर - छत्रपती शिवाजी महाराज लेटेस्ट बातमी

साताऱ्यातील पोवई नाक्यावर शिवतीर्थाचे ( Shivtirtha At Satara ) सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले ( Bjp Mp Udayanraje Bhosale ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde Grant Fund To Shivtirth At Satara ) यांनी या शिवतीर्थाच्या सुशोभिकरणासाठी 8 कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे या शिवतीर्थामुळे साताऱ्याच्या वैभवात भर पडणार आहे.

Shivtirtha At Satara
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 14, 2022, 7:55 PM IST

सातारा - पोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या ( Shivtirtha At Satara ) सुशोभीकरणासाठी खासदार उदयनराजे भोसले ( Bjp Mp Udayanraje Bhosale ) यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde Grant Fund To Shivtirth At Satara ) यांनी 8 कोटींचा निधी मंजूर केल्याने पोवई नाक्याचे रूपडे पालटणार आहे. तसेच सातार्‍याच्या ऐतिहासिक वैभवात देखील भर पडणार आहे.

नियोजन मंडळातून 3 कोटींचा निधीपोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि शंभूराज देसाईंच्या ( Minister Shambhuraj Desai ) सहकार्याने जिल्हा नियोजन मंडळातून 3 कोटी रुपये निधी यापुर्वीच मंजूर झाला आहे. त्या निधीतून सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र, आणखी निधीची गरज होती. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale Demand Fund On CM Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरपालिकेच्या माध्यमातून निधीची मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांकडून तातडीने निधी मंजूरसातार्‍याच्या लौकीकास साजेशे शिवतीर्थाचे सुशोशीकरण होण्यासाठी जादा निधीची गरज होती. त्यानुसार सातारा नगरपालिकेने प्रस्ताव सादर करून निधीची मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास खात्याने शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच गरज पडल्यास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details