सातारा- ठेकेदारांच्या बिलांवर वेळेत सह्या न करता बिले प्रलंबित ठेवल्याचा आरोप करत मुख्याधिकार्यांनी नगराध्यक्ष्यांना नोटीस पाठविली आहे. यासोबतच अपात्रतेचा प्रस्ताव शासनास का पाठवू नये, अशी कारणे दाखवा नोटीसही त्यांना पाठविली आहे. तर,मुख्याधिकार्यांना अशा प्रकारची नोटीस देण्याचा अधिकारच नसल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे असुन याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार केल्याचे नगराध्यक्ष्यांना सांगितले.
ठेकेदारांच्या बिलांवरून कराडच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धुळवड
साताऱ्यातील ठेकेदारांच्या बिलांवर वेळेत सह्या न करता बिले प्रलंबित ठेवल्याचा आरोप करत मुख्याधिकार्यांनी नगराध्यक्ष्यांना नोटीस पाठविली आहे. तर, मुख्याधिकार्यांना अशा प्रकारची नोटीस देण्याचा अधिकारच नसल्याचे नगराध्यक्षांचे म्हणणे आहे. या प्रकरणावरुन मात्र, पालिकेत चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या कामावर अमितची नजर
जिल्ह्यातील वेगाने विस्तारणार्या कराड शहरात सध्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आणि मुख्याधिकारी यशवंत डांगे याच्यांत आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू आहे. शहरातील ठेकेदार आणि विविध कामांची बिले, हा नगरपालिकेत नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे. ठेकेदारांच्या बिलांवर नगराध्यक्षांनी वेळेत सह्या न करता बिले प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून त्यांनी नगराध्यक्षांना नोटीस पाठविली आहे. यासोबतच आपल्या अपात्रतेचा प्रस्ताव शासनास का पाठवू नये, अशी कारणे दाखवा नोटीसही त्यांना पाठविली आहे. या नोटीसला रोहिणी शिंदे यांनीही प्रत्युत्तर देत, अशा प्रकारे मुख्याधिकार्यांना अशी नोटीस देण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत, त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे.