महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले - उदयन राजे म्हणाले आठवलेना मुख्यमंत्री करा

रामदास आठवले यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी युती सरकारला दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

उदयनराजे भोसले

By

Published : Nov 5, 2019, 8:00 AM IST

सातारा - सत्तेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले हे म्हणाल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री करा,' असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी युती सरकारला दिला आहे. सातारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याच्या मागणीविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की, सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत. त्यामुळे कुणाचे नाव घेणार. त्यापेक्षा थेट चिठ्ठ्या टाकून मंत्रिपद द्या.

उदयनराजे भोसले

शेतकरी कधी सदन होणार ज्यावेळी शेतकऱ्याला इंडस्ट्रियल स्टेटस द्याल तेव्हाच तो सदन होईल. असे म्हणत उदयनराजे यांनी शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. पुढे ते म्हणाले की, सरकार कोणतेही असले तरी शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पोहोचली तरी शेतकऱ्याला फार उशिरा पोहचते, आणि पोहचली तरी कितपत पोहोचते याचे मोजमाप नसते. यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते, असेही ते म्हणाले.

राज्यात इर्मा योजना लागू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्यास इतर राज्ये सुद्धा ही योजना लागू करतील. नैसर्गिक आपत्तीबाबत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. यावेळी त्यांनी नॅशनल डिझास्टर टास्क फोर्सच्या माध्यमातून जे नियोजन होईल यांची माहिती घेऊन त्यामध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details