सातारा - राज्य सरकारने राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पंचवीस किल्ल्यांची यादी मागवली आहे. या किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यभरातून अनेकांनी निषेध केला आहे. यावर आता आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका केली आहे.
सरकारच्या पर्यटन धोरणावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची टीका - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
राज्य सरकारने राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पंचवीस किल्ल्यांची यादी मागवली आहे. या किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी टीका केली आहे.
हेही वाचा - पाऊस थांबला मात्र कोयना परिसरात महापुराची स्थिती अद्यापही कायम
निवडलेले किल्ले मोठ्या हॉटेल व्यवसायिकांना देण्यात येणार आहेत. यामुळे खाजगी गुंतवणूक वाढून पर्यटन वाढेल, असे सरकारचे म्हणणे आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत पर्यटनाच्या नव्या धोरणाला परवानगी दिली आहे. याअंतर्गत राज्य सरकारची मालकी असणारे किल्ले महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळामार्फत हॉटेल व्यसायिकांना भाड्याने देणार आहेत. हे किल्ले शाही लग्न सोहळे, मनोरंजन यासाठीही उपलब्ध असतील, असे पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.