सातारा - दिल्लीत बैठकीतून बाहेर पडत असताना, मला मोदींनी हाक दिली 'दादा इधर आओ..' देवीनं (देवेंद्र फडणवीस) को भी बुलाओ.. माझे आणि मोदींचे फार जवळचे संबंध आहेत. माझ्याकडे तेरा वर्ष गुजरात होते. आम्ही एकत्र काम केले आहे. हे अनेकांना माहित आहे. मोदी मला म्हणाले 'दाद बिटीया गिरणी चाहिए' हे म्हणजे काय तर शरद पवार यांची मुलगी पडली पाहिजे, हे रात्री सव्वा दोन वाजता मोदींनी बैठकी बाहेर पडताना आपल्याला सांगितले असल्याचे, वाई येथील सभेत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मोदी मला म्हणाले की, 'बिटीया गिरनी चाहिए' शरद पवार यांची मुलगी पडली पाहिजे - चंद्रकांत पाटील - baramati
सुप्रिया सुळे यांनी राजकीय प्रवेश घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून गेल्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच उघडपणे सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता.
'बाळासाहेबांचे तेव्हाची मुलगी आणि कमळी'
सुप्रिया सुळे यांनी राजकीय प्रवेश घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून गेल्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथमच उघडपणे सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता. मग आत्ताचे राजकारण व मागील काही राजकीय वर्तुळातील गोष्टी समोर येत आहेत.
राज ठाकरे आणि शरद पवार मुलाखत...
पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली त्यात शरद पवार म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी व्यासपीठावर माझा उल्लेख काय केला.? यावर मी काही बोलत नाही. मात्र त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधीच सोडला नाही. सुप्रियाला राज्यसभेची मंजुरी द्यायची ठरवली, तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन केला. मी त्यांची भूमिका विचारली बाळासाहेब म्हणाले 'आमची मुलगी निवडणूक लढवणार असताना माझी वेगळी भूमिका काय असेल.. तुम्ही कमळीची काळजी करू नका.. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल..' आणि खरोखरच सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या होत्या.