सातारा - कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यात वरिष्ठ कार्यालये आणि कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 215 तक्रार अर्जांपैकी 102 अर्ज निकाली काढून कराड ग्रामीण पोलीस ठाण्याने अर्ज निर्गतीचे शतक ठोकले आहे.
हेही वाचा - मेगा भरतीमुळेच भाजपने सरकार घालवले; एकनाथ खडसेंनी पुन्हा डागली तोफ!
मंत्रालय, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांसह कराड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे गेल्या सहा महिन्यात नागरीकांनी 215 तक्रार अर्ज दाखल केले होते. शनिवारी तक्रार निवारण दिनात या अर्जांवर निर्णय घेण्यात आला. कराडचे डीवायएसपी सूरज गुरव, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, गणेश देशमुख, उपनिरीक्षक दळवी, राजू डांगे, दीपज्योती पाटील यांच्या उपस्थितीत अर्जदार आणि सामनेवाले यांना समक्ष बोलावून घेऊन त्यांच्या अर्जांची निर्गती करण्यात आली. वरिष्ठ कार्यालयाकडे 55, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याकडे 5 आणि टपालाद्वारे आलेले 42, असे एकूण 102 अर्ज अर्जदार आणि सामनेवाला यांच्यात मध्यस्थी करून निकाली काढण्यात आले.
हेही वाचा - बेळगाव : महाराष्ट्रात कन्नड संस्कृती जपण्याचा प्रयत्न - राऊत