महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी सातारा जिल्ह्यात - कराड

कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी ४ मे रोजी सातारा जिल्ह्यात येणार आहे. हे पथक सातारा आणि कराडमधील कोरोना परिस्थिती जाणून घेऊन केंद्र सरकारला अहवाल अहवाल सादर करणार आहे.

Central team came on Monday in Satara district to know the situation of Corona
कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी सातारा जिल्ह्यात

By

Published : May 1, 2020, 1:02 PM IST

कराड (सातारा)- कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी 4 मे रोजी सातारा जिल्ह्यात येणार आहे. हे पथक सातारा आणि कराडमधील कोरोनाची परिस्थिती जाणून घेऊन केंद्र सरकारला अहवाल अहवाल सादर करणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पन्नास पेक्षा जास्त झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५२ झालीय त्यापैकी एकट्या कराडमध्ये ४१ रुग्ण झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सातारा, कराड, उंब्रज आणि आसपासची २२ हून अधिक गावे सील करण्यात आली आहेत.

जिलह्यातील कोरोना संसर्गाची नेमकी माहिती घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येतील, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक सातारा जिल्ह्यात येणार आहे. प्रशासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात, केंद्राकडून किती आर्थिक मदत द्यावी लागेल, यासंदर्भात हे पथक अहवाल तयार करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details