सातारा - बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सोमवारी विजय दिवसाचा मुख्य सोहळा साजरा झाला. विजय ज्योतीचे स्वागत झाल्यानंतर पॅराग्लायडर्सनी केलेल्या हवाई कसरती, मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांच्या मल्ल खांबावरील आकर्षक प्रात्यक्षिकांनी कराडकरांना मंत्रमुग्ध केले. कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्यावतीने गेल्या सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे.
हेही वाचा... नगराध्यक्ष अन् सरपंच जनतेतून थेट निवडण्याची पद्धत होणार रद्द..
1971 च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ झालेल्या या सोहळ्याला विजय ज्योतीचे स्वागत करून प्रारंभ झाला. खासदार श्रीनिवास पाटील, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, वैभव नायकवडी, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, अरूण जाधव यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ सेना अधिकारी उपस्थित होते.