कराड (सातारा) - काजू घेऊन पुण्याकडे जाणारा टेम्पो मलकापूर (ता. कराड) हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गावर आज पहाटे पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. प्रदीप मुसळे आणि अमर गुरव (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत.
पुणे-बंगळुरू महामार्गावर काजूचा टेम्पो पलटी, दोघे किरकोळ जखमी - काजूचा टेम्पो पलटी
काजू घेऊन पुण्याकडे जाणारा टेम्पो मलकापूर (ता. कराड) हद्दीत पुणे-बंगळुरू महामार्गावर आज पहाटे पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
काजू भरून कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेला टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गाचे रेलिंग तोडून महामार्गावर पलटी झाला. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास मलकापूर (ता. कराड) हद्दीतील भैरवनाथ थियटरसमोर ही घटना घडली. अपघातात चालक प्रदीप मुसळे आणि अमर गुरव हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची महिती मिळताच महामार्ग हेल्पलाईनचे ईनचार्ज दस्तगीर आगा, अमित पवार, रमेश खुणे, जितेंद्र भोसले, सदाशिव साठे आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गावर पडलेल्या काजूच्या पिशव्या तसेच पलटी झालेला टेम्पो बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.