सातारा Maratha Reservation : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची १७ नोव्हेंबर रोजी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मध्यरात्री सभा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांवर गुन्हा दाखल केला. परंतु त्याची नोटीस तब्बल एक महिन्याने पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये अनेक अटी-शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे.
१४ जणांवर गुन्हा दाखल : मनोज जरांगे-पाटील यांच्या सभे दिवशी मराठा बांधवांनी प्रशासनाला सहकार्य केलं. सभा शांततेत पार पडली. त्यानंतर १९ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाच्या १४ समन्वयकांवर कराड शहर पोलिसांनी (karad police) गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात संबंधितांना कसलीही सूचना दिली नाही. थेट नोटीसा पाठवल्या. बहुतांश जणांनी नोटीस स्वीकारली नाही. यासंदर्भात सोमवारी (दि. २५) चौकशीला बोलवलं होतं. मात्र, नोटीसा घेणारे आज चौकशीला गेले नाहीत.
अटी-शर्तीसह दिली नोटीस : कराड शहर पोलिसांनी १४ मराठा बांधवांवर केलेली कारवाई वादात सापडली आहे. गुन्हा दाखल केल्याची सूचना संबंधितांना एक महिन्याने नोटीस पाठवून दिली आहे. त्यातच नोटीसमध्ये अटी-शर्ती घातल्यामुळं मराठा समाजात तीव्र संताप आहे. १४ पैकी बहुतांश जणांनी नोटीस घेतली नाही. ज्यांनी नोटीस घेतली ते आज (सोमवारी) पोलीस ठाण्यात हजर राहिले नाहीत.