महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुनेच्या छळप्रकरणी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल - mla p n patil karad news

आदिती राजेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील, पती राजेश पाटील आणि नणंद सौ. टीना महेश पाटील यांनी संगनमताने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. फिर्यादी अदिती पाटील या सध्या आपले वडील सुभाष पांडुरंग पाटील (रा. वाखाण रोड, कराड) यांच्याकडे वास्तव्यास आहेत.

mla p n patil
आमदार पी. एन. पाटील

By

Published : Sep 12, 2021, 4:51 PM IST

Updated : Sep 12, 2021, 5:35 PM IST

कराड (सातारा) - सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आदिती राजेश पाटील यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

सुनेनी केली फर्याद -

कराड पोलिसांनी सांगितले की, आदिती राजेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील, पती राजेश पाटील आणि नणंद सौ. टीना महेश पाटील यांनी संगनमताने शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पी. एन. पाटील यांच्यासह मुलगा राजेश, विवाहित मुलगी टीना यांच्याविरूध्द फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देण्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अदिती पाटील या सध्या आपले वडील सुभाष पांडुरंग पाटील (रा. वाखाण रोड, कराड) यांच्याकडे वास्तव्यास आहेत. राज्याचे सहकार मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची ती पुतणी आहे.

हेही वाचा -'आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाही'; राष्ट्रीय महिला आयोग सदस्यांनी घेतली साकीनाका पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

Last Updated : Sep 12, 2021, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details