महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात सामुदायिक नमाज पठण करणाऱ्या १० जणांवर गुन्हा

संचारबंदीसह जमावबंदीचा आदेश लागू असताना शुक्रवारी सामुदायिक नमाज पठण करणाऱ्या दहा जणांविरोधात साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाणे
शाहूपुरी पोलीस ठाणे

By

Published : Mar 28, 2020, 7:55 AM IST

सातारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू आहे. मात्र, असे असतानाही मेहर देशमुख कॉलनीतील एका इमारतीच्या टेरेसवर सामूहिक नमाज पठण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार पेट्रोलिंग करत असताना शुक्रवार (दि. 27 मार्च) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करंजे पेठेतील मेहर देशमुख कॉलनीत एका इमारतीच्या टेरेसवर दहा लोक नमाज पठण करत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी श‍सनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. कोरोना प्रतिबंध उपाय योजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध केला आहे. या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी 10 जणांविरुद्ध साताऱ्याच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा -उपविभागीय अधिकारी शहरातील रस्त्यांवर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details