सातारा - येथील एका महिलेचा विनयभंग करत अन्य तिघांना मारहाण करुन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी किचन ट्रॉली बनविणाऱ्या व्यवसायिकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप देशमुख, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.
पैसे देण्यास नकार दिल्याचा राग
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रताप देशमुख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. अयोध्यानगरी, राधिका रोड, सातारा) याने तक्रारदार महिलेच्या घरी जावून तिच्या सासऱ्याकडे किचन ट्रॉली बनविण्याचे पैसे मागितले. सासऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्यामुळे प्रताप देशमुखने तक्रारदार महिलेच्या सासूच्या हाताची बोटे पिरगळली. यानंतर त्याने तिच्या पती आणि सासऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. यावेळी तक्रारदार महिलेने मध्यस्थी केली असता त्यांना मारहाण करत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यानंतर 'पैसे कसे वसूल करायचे ते मला माहित आहे,' असे सांगून प्रताप देशमुख तेथून निघून गेले.
शाहूपुरी पोलिसांकडे तपास या घटनेनंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रताप देशमुख याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत प्रताप देशमुख याला अटक झालेली नव्हती.
हेही वाचा -सातारा : रामकृष्णनगर येथून परप्रांतिय भावंडाचे अपहरण