महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी आमदार शिवेंद्रराजेंसह ८० समर्थकांवर गुन्हे दाखल - जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर शिवेंद्रराजेंसह ८० समर्थकांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

shivendraraje bhosale
शिवेंद्रराजे भोसले

By

Published : Dec 21, 2019, 10:12 AM IST

सातारा - महामार्ग व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात आणि महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर शिवेंद्रराजेंसह ८० समर्थकांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -जनआक्रोश: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात धगधगताहेत 'ही' शहरं

जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश दिले होते. मात्र, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रराजे भोसले, फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी, सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुंखे, जितेंद्र कदम, सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासिर शेख, अशोक मोने, अमोल कदम, जयंत चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते, अभय पवार यांच्यासह ८० जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा -नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'

ABOUT THE AUTHOR

...view details