महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाबळेश्वरजवळ कार कोसळली दरीत; नशीब बलवत्तर म्हणूनच वाचले प्राण - महाबळेश्वरजवळ कार कोसळली दरीत

पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आले होते. काही कामानिमित्त ते वाईला गेले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉप जवळ त्यांची कार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला कोसळली. काही फूट अंतरावर असणाऱ्या झाडात ती अडकल्यामुळे कारमधील तिघांचे प्राण वाचले.

Charges filed against six persons in kidnapping case at pandharpur
अपहरण प्रकरणी सहा जणाविरोधात गुन्हा दाखल

By

Published : Jun 18, 2021, 1:44 PM IST

सातारा -वाई- महाबळेश्वर रस्त्यावर वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात वळण चालकाच्या लक्षात न आल्याने रस्त्याचा संरक्षक कठड्यावर चढून दरीत गेली. तीन-चारशे फूट खाली खोल दरीत कोसळताना काही फूट अंतरावर झाडात अडकल्याने मोटारीतील तीन प्रवासी बालबाल बचावले आहेत.

महाबळेश्वरजवळ कार कोसळली दरीत

पाऊस अन् धुक्याने फसगत -

पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आले होते. काही कामानिमित्त ते वाईला गेले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉप जवळ त्यांची कार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. काही फूट अंतरावर ती असणाऱ्या झाडात अडकल्यामुळे कारमधील एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. ही कार (एमएच १२ ओ टी६६७२) दुपारी वाईहून पाचगणीकडे निघाली होती. पसरणी घाटातून पाचगणीकडे जात असताना मुसळधार पाऊस आणि घाटातील धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात आले नाही. यातच कार दरीत गेली होती.

नशीब बलवत्तर म्हणूनच -

कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नशीब बलवत्तर म्हणूनच गाडीतील सर्वांचेच प्राण वाचले अन्यथा कार तीनशे-चारशे फूट खाली दरीत कोसळली असती. ही माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साह्याने मोटार बाहेर काढण्यात आली.

हेही वाचा - सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर, वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details