महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२०० फूट दरीत कार कोसळून युवती ठार - सातारा बातमी

कास पठारावर फिरायला गेले असता. कार दरीत कोसळून एक युवती ठार झाल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. अन्य एक युवक व युवती गंभीर जखमी झाले आहेत.

कार अपघात
कार अपघात

By

Published : Dec 5, 2020, 4:39 PM IST

सातारा - कास यवतेश्वर रस्त्यावर, गणेश खिंडीत साताऱ्याकडे येणारी कार २०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात २५ वर्षीय युवती जागीच ठार झाली. अन्य एक युवक व युवती गंभीर जखमी झाले आहेत.

कोमल बापूराव पाटील (वय २५, रा. बोरखळ, ता. सातारा) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे. प्राजक्ता दिलीप साबळे (वय २४) व अमर दीपक शिर्के (वय २४, दोघेही रा. मार्केट यार्डपरिसर सातारा) अशी जखमींची नावे आहेत.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात -

हे तिघेही कारने फिरण्यासाठी कास पठारावर गेले होते. साताऱ्याकडे येताना गणेश खिंडीत अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार परळीबाजूला दोनशे फूट दरीत कोसळली. कार कोसळत असतानाच कार चालवणारा अमर व पाठीमागे बसलेली प्राजक्ता कारमधून बाहेर फेकले गेले. अमर जखमी अवस्थेत दरीतून वर आला. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचले. मात्र या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.

ट्रेकर्सच्या मदतीने कोमल पाटील हिचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-इन्फ्ल्युएन्झाच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

हेही वाचा-मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या विरोधात कर्नाटक बंद; कन्नड संघटनांचा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details