सातारा -साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना हा अपघात झाला आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी कठड्याला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुण्याकडे जाताना अपघात -पुण्यातील सराफ कुटुंबीय गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना त्यांच्या इनोव्हा कारला (क्र. एम. एच. 14 डी. एफ. 6666) खंबाटकी बोगद्यात अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी कठड्याला धडकली. या अपघातात रंजना ज्ञानेश्वर सराफ (वय 52) आणि कांतीकाबाई वाल्मीक जाधव (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर विश्वनाथ सराफ (वय 60), प्रशांत ज्ञानेश्वर सराफ, प्रतीक ज्ञानेश्वर सराफ, नेहा सराफ, पूजा शशिकांत जाधव आणि काशीनाथ रेवनशिधाप्पा वारद हे गंभीर जखमी झाले.